सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (20:53 IST)

मी माझ्या शिक्षणापासून दूर राहिलो आहे, तरीही महाराष्ट्र शासन आम्हाला मराठा आरक्षण देत नाही", म्हणत तरुणाने आत्महत्या केली

suicide
हिंगोली: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील अनेक दिवसांपासून विविध मार्गांनी आंदोलन केले जातंय. मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांच्याकडून तरुणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तरीही या विषयावरून होणाऱ्या आत्महत्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र आहे.  
 
मराठा आरक्षणासाठी राज्यातील आत्महत्यांच्या संख्येत वाढ होत असून अशातच आता हिंगोलीतील नहाद गावामध्ये 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. नहाद गावातील  रहिवासी असलेल्या 21 वर्षीय गोविंद कावळे या तरुणाने चिठ्ठी लिहत मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे. गावाजवळ असलेल्या विहिरीत उडी घेत त्याने आपलं जीवन संपवलं.
 
दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी गोविंद कावळेने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्या चिठ्ठीत म्हटलंय की, मी माझ्या शिक्षणापासून दूर राहिलो आहे. तरीही महाराष्ट्र शासन आम्हाला मराठा आरक्षण देत नाही. म्हणून मी आत्महत्या करत आहे. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आहे.
 






Edited By - Ratnadeep Ranshoor