रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 जानेवारी 2025 (13:34 IST)

सोलापुरात ट्रेनवर दगडफेक, प्रवाशांना दुखापत, गुन्हा दाखल

train
सोलापुरात गेल्या दहा दिवसांत दुसऱ्यांदा रेल्वेवर दगडफेक झाल्याची बातमी समोर आली असून, त्यानंतर प्रवाशांचे हाल होत आहेत. सोलापूर विभागात रेल्वेवर दगडफेक होण्याची दहा दिवसांत ही दुसरी वेळ आहे. पारेवाडी ते वाशिंबे दरम्यान मुंबई-चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली.या दगडफेकीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी मुंबई-चेन्नई एक्सप्रेस,वर दगडफेक केली. अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला दगडफेकीत किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले.
या दगडफेकीत अपांगच्या डब्यात बसलेल्या प्रवाशाला दुखापत झाली असून त्याच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. रेल्वेच्या काचा फुटल्या आहे. या प्रकरणी सोलापुर रेलवे पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिस प्रकरणाचा तपास करत आहे. 
 
Edited By - Priya Dixit