रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 डिसेंबर 2020 (21:01 IST)

प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाने  मोठा दिलासा दिला आहे. प्रताप सरनाईक यांच्यावर कोणतीही कारवाई करु नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग सरनाईक यांनी ईडीच्या नोटीसला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
 
मला ईडीच्या नोटीस आलेल्या आहेत, त्यांना तसे पत्राद्वारे उत्तरही पाठवले आहे. ईडी ज्या ज्या वेळी चौकशीला बोलवेल, तेव्हा तेव्हा मी जाईन, असे सरनाईक यांनी म्हटले होते. त्याचवेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कुठलीही कारवाई न करण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने ईडीला दिले आहेत.