सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जून 2019 (16:45 IST)

काय हे, पत्नीला शिक्षक पतीने कॉप्या पाठवल्या

नाशिकमध्ये डी. एड.ची परीक्षा देणाऱ्या पत्नीला शिक्षक पतीने कॉप्यांचा पुरवठा केला आहे. शहरातील गंगापूर रोडवरील मविप्र संस्थेच्या महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयात बिल्डिंग कंडक्टर यांनी कारवाई शिक्षकाला रंगेहात पकडले आहे. 
 
जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने डी. एड.च्या परीक्षा सुरू आहेत. त्याचे केंद्र महर्षी शिंदे अध्यापक विद्यालयात असल्याने, शुक्रवारी येथील महिला परीक्षार्थीला एक व्यक्ती कॉपी पुरवत असल्याचे बिल्डिंग कंडक्टर तथा प्राचार्य संजय काळोगे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ त्या किरण बडगुजर नामक शिक्षकाला पकडून केंद्र प्रमुखाकडे नेले. तसेच, परीक्षार्थी भावी शिक्षिकेचा पेपर जप्त केला. मात्र, काही वेळात संधी साधत शिक्षक येथून फरार झाला. हा शिक्षक जिल्हा परिषदेच्या पेठ तालुक्यातील कोटंबी शाळेवर कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.