बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑगस्ट 2020 (08:54 IST)

ठाकरे सरकारची मराठा आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांसाठी मदत

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निणर्यांपैकी एक मोठा निर्णय मराठा आंदोलनात बलिदान देणार्‍यांसाठी देखील घेण्यात आला आहे. या आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारने नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि नोकरी देण्याबाबत मागील सरकारने निर्णय घेतला होता. आज या विषयावर पुन्हा चर्चा करीत यावर निर्णय घेण्यात आला. यांना एसटी महामंडळात त्यांना नोकरी देण्यात येणार आहे.
 
या व्यतिरिक्त मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय –
सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणामुळे बाधित झालेल्या वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांच्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यात येणार
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना सुरु करण्यात येणार
मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी म्हाडा अधिनियम १९७६ मध्ये सुधारणा होणार
महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या कायम मर्यादेत तात्पुरती वाढ करण्यासाठी अधिनियमात दुरुस्ती होणार
अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीना नोव्हेंबरपर्यंत मोफत चणा डाळ मिळणार
शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ
मुचकुंदी लघू पाटबंधारे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता