सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जुलै 2020 (22:31 IST)

ठाण्यात लॉकडाउनमध्ये १९ जुलैपर्यंत वाढ

ठाणे महापालिका क्षेत्रातील लॉकडाउनमध्ये १९ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेकडून यासंबंधी अधिकृत आदेशही प्रसिद्ध करण्यात आला आहे. याआधी करोनाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता २ जुलैपासून ठाणे महापालिका क्षेत्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. १२ जुलै रोजी हा लॉकडाउन संपणार होता. पण आता लॉकडाउनची मुदत वाढवली असून १९ जुलैपर्यंत कायम राहणार आहे.
 
आदेशात सांगण्यात आलं आहे की, ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी २ जुलै ते १२ जुलैपर्यंत लॉकडाउन जाहीर केला होता. आणखी काही कालावधीसाठी लॉकडाउन वाढवणं गरजेचं आहे अशी महापालिका आयुक्तांची खात्री झाली आहे. त्यामळे १२ जुलैपासून सकाळी ७ वाजल्यापासून ते १९ जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत लॉकडाउन जाहीर करत आहोत.
 
लॉकडाउनच्या या काळात केवळ घरकाम करणाऱ्या व्यक्तींना कामावर जाण्याची मुभा असेल. या व्यतिरिक्त बाकीच्या अटी आणि नियम पूर्वीप्रमाणेच लागू राहतील.