मोठी बातमी : दुकानांची वेळ रात्री 8 पर्यंत असणार
ज्या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण कमी आहे तिथे निर्बंध शिथिल करण्याबाबत सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.या आदेशावर मुख्यमंत्र्यांकडून शिक्कामुर्तब झाल्याचे वृत्त मिळत आहे.आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री आठ वाजे पर्यंत दुकानं सुरु ठेवण्याचे निर्णय घेतले आहे.आणि या साठी जीआर काढण्यात येत आहे.सध्या दुकाने 4 वाजे पर्यंतच सुरु आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
सध्या सकाळी 7 ते दुपारी 4 वाजे पर्यंतच दुकाने सुरु आहेत.दुकाने सुरु असण्याची वेळ वाढवावी अशी मागणी व्यापारी बांधवांकडून करण्यात आली होती.त्यामुळे राज्यात आता दुकाने 8 वाजे पर्यंतच सुरु असणार असे आदेश आज काढण्यात येणार. परंतु ज्या ठिकाणी कोरोनाचे प्रमाण कमी आहे त्याच ठिकाणी हे आदेश लागू होतील.आणि ज्या ठिकाणी अद्याप कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेले निर्बंध कायम असणार असं मुख्यमंत्री म्हणाले.