बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 जुलै 2021 (17:33 IST)

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील नातु व आजोबा ठार

नाशिक – भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील नातु व अजोबा ठार झाल्याची घटना नाशिकरोड परिसरातील सावता माळी रोडवर मंगळवारी (दि.२९) सकाळी घडली. 
 
भगवान दगडू गायकवाड (६७) व अरिन अविनाश अंबोरे (३, रा. डी.जी.पी.नगर, नाशिकरोड) अशी मृत्यु झालेल्यांची नावे आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भगवान गायकवाड हे त्यांच्या ३ वर्षीय नातवाला दुचाकीवर बसवुन घराकडे येत असताना चालक मद्याच्या नशेत भरधाव चालवत असलेल्या एमएच ०२ बीवाय ४४१५ या कारने त्यांना पाठिमागुन जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झोलेल्या दोघांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तत्पुर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
 
नाशिक – राहते घरी एकाने गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना गंजमाळ परिसरात मंगळवारी (दि.२९) रात्री घडली. शाम मोहन थाटसिंगार (२१, रा. पंचशीलनगर, गंजमाळ) असे आत्महत्या करणार्‍याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शाम याने राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहा्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.