बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 फेब्रुवारी 2019 (11:36 IST)

राज्यात थंडी अजूनही कायम तर काही ठिकाणी पावसाची शक्यता

राज्यातील सर्वच भागांतील किमान तापमान सरासरीच्या आसपास असल्याने गारवा कायम असून जोरदार थंडी आहे.  उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्याच्या हवामानावर परिणाम झाला आहे. २ फेब्रुवारीला मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे अजून तपमान कमी होणार आहे. देशातील उत्तर भारतातील जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरयाणा आदी भागांतील थंडी अजूनही, कायम आहेत. राज्यात शुक्रवारी विदर्भातील गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ८.४ अंश किमान तापमानाची नोंद झाली. प्रमुख ठिकाणी मागील चोवीस तासांत नोंदविले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुढीलप्रमाणे- मध्य महाराष्ट्रातील पुणे ११.७, नगर १०.२, जळगाव ९.४, कोल्हापूर १७.०, महाबळेश्वर १३.४, मालेगाव १२.४, सांगली १२.५, सातारा १३.०, सोलापूर १५.५. कोकणातील मुंबई (कुलाबा) १९.०, सांताक्रुझ १६.४, रत्नागिरी ७.७, मराठवाडय़ातील औरंगाबाद १२.२, नांदेड १४.७, बीड १४.८, तर विदर्भातील अकोला १३.५, अमरावती १२.४, बुलढाणा १४.४, ब्रह्मपुरी १०.३, चंद्रपूर १३.६, नागपूर ९.२ आणि वर्धा १२.९.