सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जून 2019 (08:50 IST)

आधार कार्ड साठी महिलेकडे केली सरपंचाने सेक्सची मागणी

नागपूर येथे धक्कादायक व संताप अनावर करवणारा प्रकार समोर आला आहे. आधीच आधार कार्ड साठी नागरिक जेरीस आले आहे त्यात आता एका सरपंचाने तर कहर केला आहे. आधार कार्ड बनवून देण्याचे आश्वासन देऊन शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सरपंचाला गावकऱ्यांनी बेदम चोपले आहे. महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणारी ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी सरपंच शैलेश राऊत याला बेदम मारहाण केली. हा प्रकार रामटेक तालुक्यातील काचुरवाही गावात घडला.काचुरवाही गावात राहणाऱ्या एका महिलेचे आणि तिच्या पतीचे भांडण सुरु होते. शैलेश हा त्यांच्या ओळखीचा असल्याने त्याने त्यांच्यात समेट घडवून आणण्याचा बहाणा करत महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला आधार कार्ड आणि रेशन कार्ड बनवून घेण्याचा सल्ला दिला. तू जर आधार कार्ड काढले तर पतीच्या संपत्तीचा आर्धा वाटा तूला मिळेल असे तिला सांगितले. त्यासाठी मी सांगेन तसे तूला वागावे लागेल असे सांगितले. तसेच नवऱ्याच्या फोनवरून फोन करत जाऊ नकोस. आधार कार्ड काढून देण्यासाठी मी तूला पैसे देतो. त्याचे हे बोलणे व्हायरल झाल्यावर संतप्त ग्रामस्थांनी त्याला चोप दिला. तसेच त्याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याचे सरपंच पदही जाण्याची शक्यता आहे.