शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 12 जून 2022 (12:04 IST)

कुत्र्यांनी घेतला घरासमोर खेळत असलेल्या चिमुकल्याचा जीव

नागपुरातून एक धक्कादायक घटना घडल्याची बातमी आली आहे. घरासमोर खेळत असलेल्या एका लहानग्या चिमुकल्याचा जीव रस्त्यावरील कुत्र्यांनी घेतला आहे. घराबाहेर खेळत असलेल्या या चिमुकल्यावर रस्त्यावरील कुत्र्यांनी हल्ला केला. 
 
अचानक झालेल्या या कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकल्याचा दुर्देवी अंत झाला आहे. ही दुर्देवी घटना शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास काटोल मध्ये घडली आहे. विराज जयवार असे या मयत चिमुकल्याचं नाव आहे. काटोलमध्ये जयवार कुटुंबातील पाच वर्षीय मुलगा विराज हा घरासमोर खेळत असताना रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांच्या कळपाने अचानक हल्ला केला आणि त्याचे लचके तोडायला सुरू केले.विराजने आरडाओरडा केल्यावर  जवळच्या स्थानिकांनी विराजला रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी काटोल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.