शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 फेब्रुवारी 2023 (19:53 IST)

शेतकऱ्याने महावितरण विभागाच्या अभियंत्याला इंग्रजीत सुनावले

शेतकरी कधी इंग्रजीत संभाषण करू शकतो कदाचित हे अशक्य असेल पण सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात एका  शेतकऱ्याने महावितरणच्या अधिकाऱ्याला चक्क इंग्रजीमध्ये खडेबोल सुनावले. आटपाडी तालुक्यात महावितरण विभागाकडून वीज चोरी रोखण्यासाठी काही पथके नियुक्त करण्यात आली आहे.आटपाडी तालुक्यात वीज चोरी होत असल्याचे समजले महावितरणची पथक वीजचोरी पकडण्यासाठी कार्यालयातील सहायक अभियंता सुनील पवार पथकासह मंगळवारी आटपाडी तालुक्यात य.पा. वाडी गावातील वेताळ चव्हाण हे शेतामध्येच होते.चव्हाण यांनी विहिरीत पंपासाठी विजेची चोरी केल्याचे समजले. या वेळी चव्हाण यांनी सहाय्यक अभियंता पवार यांच्याशी चक्क इंग्रजीत संभाषण करत आपली बाजू मांडली.या दोघातील संवाद पथकातील काही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले असल्यामुळे व्हायरल झाले आहे.  
 
Edited By - Priya Dixit