शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 जुलै 2021 (15:41 IST)

कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेऊ नये, आपली लायकी काय?

अमोल कोल्हे यांनी अकलेचे तारे तोडत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी शरद पवार यांच्या आशीर्वादाने आहेत असे वक्तव्य केलं. हे बोलण्याची त्यांची उंची आहे का? कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा मुका घेऊ नये,आपली लायकी काय? आपण बोलतो काय?” अशा शब्दांमध्ये माजी खासदार आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच, “शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मोठं केलं आहे.राष्ट्रवादीचे खासदार जरी असाल, तरी प्रकाश झोतात आणण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.” असं देखील आढळराव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे यांना उद्देशून म्हटलं म्हटलं आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामावरून राष्ट्रवादीचे खासदारअमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात ठिणगी पडली असून,आता एकमेकांवर जोरदार टीका टिप्पणी सुरू झाल्याचे दिसत आहे.
 
या पार्श्वभूमीवर बोलतना माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले की,“मी खासदार नाही ठीक आहे, पण पुणे – नाशिक बायपास, नारायणगाव या रस्त्याच्या उद्घटनाच्या वेळी फोन तरी करायचा, निमंत्रण द्यायचं. या माणसामुळे काम झालं आहे. यांना बोलवावं. निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रवादी सोडून इतरांचे फोटो नाहीत. माझी एवढीच माफक अपेक्षा आहे. की, माझ्या मुख्यमंत्र्यांचा फोटो आला पाहिजे होता आणि मला निमंत्रण द्यायला पाहिजे होतं.” असं देखील आढळराव यांनी बोलून दाखवलं आहे.