शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑगस्ट 2022 (13:44 IST)

विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शाळेत ठेवलेला एलईडी टीव्हीच पळवून नेला

crime
येवला तालुक्यातील पुरणगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतून चोरट्यानी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शाळेत ठेवलेला ३२ इंची एलईडी टीव्हीच पळवून नेला. या चोरीची ही घटना मात्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा टीव्ही एका छोट्या टेम्पोतून नेला आहे. या प्रकरणी राहुल गांगुर्डे यांनी येवला तालुका पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे दोन वर्षापूर्वी याच शाळेतून सीसीटीव्ही व अन्य साहित्य चोरीला गेले होते. त्याचा तपास लागलेला नसताना पुन्हा चोरी झाल्याने चोरट्यांचा तातडीने तपास करावा अशी मागणी करण्यात येत आहे.