मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मंगळवेढा , रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (20:10 IST)

लग्नासाठी PSI असल्याचं सांगत टाकलं जाळं

arrest
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील एक तरुणी पोलिस भरतीचा प्रयत्न करत होती. यादरम्यान त्यांची भेट आरोपी रमेश भोसले याच्याशी झाली. या ओळखीनंतर आरोपीने मुलगी आणि तिच्या पालकांशी जवळीक साधली. मी पीएसआय असून मंगळवेढा पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याची खोटी माहिती आरोपीने पीडितेच्या पालकांना दिली. मुलीनेही काही दिवस त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यातून त्यानं पिडीत तरुणीशी अधिक जवळीक वाढवत पीडितेच्या नातेवाईकांकडे लग्नासाठी तगादा लावला.
 
या आरोपीचे नाव रमेश भोसले आहे. तो सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील रहिवासी आहे. आरोपी भामट्याने पंढरपूर येथील एका मुलीला पीएसआय आणि वडील आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून लग्नासाठी जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणी आणि तिच्या नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे भामट्या पीएसआय रमेश भोसले याचा हा प्रयत्न फसला. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली आहे.