शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 15 जानेवारी 2023 (17:45 IST)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली

nitin gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त (CP) अमितेश कुमार यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुरुंगातून धमक्या येत होत्या. फोन करणारा जयेश कंठा हा कुख्यात गुंड आणि खूनाचा आरोपी असून तो कर्नाटकातील बेळगावी कारागृहात बंद आहे. कारागृहात बेकायदेशीरपणे फोन वापरून त्याने गडकरींच्या कार्यालयाला धमकावले.
 
कारागृह प्रशासनाने आरोपींकडून एक डायरी जप्त केल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले, नागपूर पोलिसांचे एक पथक तपासासाठी बेलगावला रवाना झाले आहे. नागपूर पोलिसांनी प्रॉडक्शन रिमांडची मागणी केली आहे. नितीन गडकरी यांना दोनदा कॉल करण्यात आला, प्रथम सात मिनिटांत, त्यानंतर तासाभराने दुसरा धमकीचा कॉल. पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात सकाळी 11.25, 11.32 आणि 12.32 वाजता तीन धमकीचे कॉल आले. 
 
नागपूर डीसीपी राहुल मदने म्हणाले की नितीन गडकरी यांना तीन धमकीचे फोन आले होते. गडकरींच्या सध्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.खामला भागातील गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयाला सकाळी ११.२५ ते दुपारी १२.३० दरम्यान तीन धमकीचे कॉल आले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. शनिवारी रात्री एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, कॉल करणाऱ्याची ओळख पटली असून गुन्हे शाखेचे पथक कर्नाटकला पाठवण्यात आले आहे.
 
Edited By - Priya Dixit