समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन २६ मे ला
मुंबई : समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन २६ मे २०२३ रोजी मुख्यंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. दुसरा टप्पा शिर्डी ते घोटीपर्यंत आहे. हा रस्ता ८० किमीचा आहे. हे अंतर ४० ते ४५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.
मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. एकूण ७०१ किमीचा हा मार्ग आहे. यातील पहिला ५०१ किमाचा टप्पा सुरु झाला आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते करण्यात आले होते. पुढील शिर्डी ते भरवीरपर्यंतच्या ८० किमी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. हे अंतर ४० ते ४५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. तर भरवीर ते नागपूर अंतर सहा तासांत पूर्ण करता येणार आहे.
शिर्डी ते भिवंडी या सर्वात महत्त्वाच्या टप्प्याचं काम अजून सुरु आहे. या मार्गातील सिन्नर ते कसारापर्यंत १२ बोगदे आणि छोट्या पुलांच काम सुरु आहे. भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर पर्यंत खुला होणार आहे. त्यानंंतरच समृद्धी महामार्ग शंभर टक्के सुरु होईल.
Edited by : Ratnadeep Ranshoor