गुरूवार, 31 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (14:22 IST)

नुकसानी मुळे शेतकऱ्याचे अश्रू अनावर, महापुरामुळे जगण्यासाठीचा संघर्ष सुरु

यंदाच्या वर्षी पावसाने अक्षरश : थैमान घातला आहे. मराठवाड्यातील शेतकरी हवाल दिल झाला आहे.महाराष्ट्रात पावसाने उच्छाद मांडला असून सर्वत्र पुरामुळे शेतकरींचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात तर शेतकऱ्यांनी सोयाबीनला चांगला भाव मिळत आहे म्हणून आपल्या अर्ध्या शेतात सोयाबीनची पेरणी केली. सोयाबीनचे पीक देखील चांगले आहे होते .परंतु सेप्टेंबरच्या महिन्यात नदीला महापूर आला आणि सोयाबीनची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आणि जणू शेतकरींच्या डोळ्यातून महापूरच वाहू लागला. अश्रूंचा बांधा फुटून अश्रू अनावर झाले. या शेतकरींना कोणत्याही प्रकारची मदत कुठून ही मिळालेली नाही. आता पुढे रब्बीचा हंगाम येत आहे त्यासाठी खत बियाणे कुठून आणावे हे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न आहे. या क्षेत्रात नेते अधिकारी पाहणी करून गेले, पण त्यांच्या कडून कोणतीही मदत करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता खायचे काय आणि जगायचे कसे ,आपल्या कुटुंबियांचे उदर निर्वाह कसे करायचे? औषधोपचारासाठी पैसे कुठून आणायचे. असे प्रश्न शेतकरींच्या पुढे आहे.राज्य शासनाकडून शेतकरींना हेक्टरी 10 हजारची मदत करण्याचे जाहीर केले आहे.पण ती मदत कधी मिळणार याची शेतकरी बांधव वाट बघत आहे. काही शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली होती आता त्यांनी व्याजाचे पैसे कसे द्यायचे हा मोठा प्रश्न आहे या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.