शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (08:29 IST)

जुन्या कसारा घाटात बर्निंग कारचा थरार

मुंबई नाशिक महामार्गावर जव्हार फाट्याजवळ जुन्या कसारा घाटात झिरो पॉइंट भागात वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने एका कारने अचानक पेट घेतला. यावेळी कारचालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला उभी करून तो बाहेर पडला. यामुळे कसारा घाटात बर्निंग कारचा थरार पाहावयास मिळाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्र घोटी, इगतपुरी नगरपरिषद अग्निशमन दल, टोल प्लाझाचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले.

खबरदारीचा उपाय म्हणून महामार्ग पोलीस व घोटी टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांनी जुन्या घाटातील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवली होती.



Edited By - Ratnadeep ranshoor