सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2024 (12:09 IST)

रबी ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात घट झाली त्यामुळे ‘ज्वारी’ कडाडणार

rabi crop
राज्यात जेथे ज्वारी पिकते इथे हवा तसा मान्सून आणि परतीचा पाऊस न झाल्यामुळे रबी ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात घट झाली आहे. तर सांगली जिल्ह्यात ज्वारीचे सरासरी एक लाख २६ हजार ६६ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी एक लाख चार हजार ६०१ हेक्टर म्हणजे ८३ टक्के क्षेत्रावर रबी ज्वारीची पेरणी झाली आहे.

जवळपास १७ टक्के पेरणी क्षेत्र घटले आहे. यामुळे ज्वारीचे भाव भविष्यात तेजीत असतील, असा व्यापा-यांनी अंदाज व्यक्त केला आहे. सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, मिरज, खानापूर, तासगाव तालुक्यात सर्वाधिक ज्वारीची पेरणी होते. यंदा दुष्काळी स्थितीमुळे ज्वारीच्या उत्पादकतेत घट होणार आहे. सध्या मार्केट यार्डातही आवक घटली आहे. तरीही नवीन आवक सुरू झाल्याने सध्या चार हजार १२५ ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

एक लाख हेक्टरवर उन्हाळी ज्वारी
जिल्ह्यात रबी ज्वारीचे सरासरी एक लाख २६ हजार ६६ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी एक लाख चार हजार ६०१ हेक्टर म्हणजे ८३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कमी पावसामुळे जिल्ह्यात १७ टक्के क्षेत्र घटले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी पेरा घटला
अनेक ठिकाणी रबी ज्वारीची १०० टक्के पेरणी झाली होती. पण, यावर्षी मान्सून आणि उन्हाळी पाऊसच झाला नसल्यामुळे केवळ ८३ टक्केच पेरणी झाली आहे. जवळपास १७ टक्क्यांनी पेरणी क्षेत्र घटले आहे.

पाच हजारांचा भाव
ज्वारीला सध्या चार हजार १२५ ते पाच हजार रुपये दर मिळत आहे. ज्वारीची काढणी सुरू झाल्यामुळे आवक वाढली आहे. यामुळे सध्या ज्वारीचे दर स्थिर आहेत. मात्र यंदा पेरा घटल्याने दर कडाडणार असल्याचे व्यापा-यांनी सांगितले आहे. त्याचा शेतक-यांना लाभ होईल.

भाव स्थिरच असणार
सांगली जिल्ह्यासह सोलापूर, बीड, उस्मानाबाद, सातारा जिल्ह्यासह कर्नाटकातील विजापूर, अथणी परिसरात ज्वारीच्या काढणीला सुरुवात झाली आहे. ज्वारीची आवक वाढणार असल्यामुळे काही दिवस ज्वारीचे दर स्थिर असणार आहेत, असे व्यापा-यांनी सांगितले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor