मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (08:20 IST)

शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याची कुठल्याही प्रकारची भीती नाही : रावसाहेब दानवे

सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं किंवा हे सरकार अल्पकाळ टिकेल, अशी भाकितं काही राजकीय नेत्यांकडून वर्तवण्यात आली आहेत. या चर्चांना भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे सरकार आपला उर्वरित कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
शिंदे-फडणवीस सरकार पडू शकत? या विरोधकांच्या दाव्याबाबत विचारलं असता रावसाहेब दानवे म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याची कुठल्याही प्रकारची भीती नाही. विरोधकांनी आधी त्यांच्या मनातील भीती काढून टाकावी. हे सरकार आपला उर्वरित कार्यकाळ पूर्ण करेल आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीला आम्ही एकत्र सामोरं जाऊ. एवढेच नव्हे तर २०२४ ला आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ, असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.