मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 जानेवारी 2021 (08:29 IST)

एमआयएमबरोबर यापुढे कधीच निवडणूक समझोता होणार नाही

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी  पुन्हा एकदा एमआयएमबरोबर यापुढे कधीच निवडणूक समझोता होणार नाही, हे स्पष्ट केले. आंबेडकर हे शिकलकरी समाजाच्या मेळाव्यानिमित्त औरंगाबादेत आले होते. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात हा मेळावा झाला. दरम्यान, तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “असं काय घडलं की आपण एमआयएमबरोबर कधीच निवडणूक समझोता करणार नाही?”, या प्रश्नाचे उत्तर द्यायचे त्यांनी टाळले. “आम्ही स्वतःच्या बळावर निवडणुका लढू शकतो हे स्वीकारण्याची तुमची मानसिकता का नाही?”, असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला.
 
दरम्यान, नामांतरापेक्षा औरंगाबादच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मला कळीचा वाटतो. महापालिका वंबआच्या ताब्यात दिल्यास दररोज दोन तास पाणी रात्री दहाच्या आत पुरविण्याची खात्री मी देतो. अकोल्यात आम्ही हे करून दाखवले आहे असे सांगितले.