शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

स्वतःच्या पक्षातील मेगागळतीची चिंता करा – मुख्यमंत्री

भाजपमध्ये देशात आणि सध्या राज्यात अनेक नेते येत आहे. विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह स्थानिक नगरसेवक, आमदार आणि पदाधिकारीही भाजपाचा प्रवेश करत आहेत. कधीकाळी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच भाजपा पक्षात घेत असल्याची टीका विरोधी पक्षांकडून भाजपवर होते आहे. हाच धागा पकडत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टिप्पणी केली होती. 'भाजपकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे ज्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे भ्रष्ट लोक तिकडे गेल्यावर स्वच्छ होतात?', असा प्रविचारला आहोत. मुख्यमंत्र्यांनी या टीकेवर जशास तसं प्रत्युत्तर दिलं. भुसावळ इथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री म्हणाले की ,  आम्ही कुठलीही वॉशिंग पावडर वापरत नाही. आमच्याकडे विकासाचं डॅशिंग रसायन आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच अनेक पक्षांचे लोक आमच्याकडे येत असून पक्षात प्रवेश करत  आहेत. सध्या  विरोधी पक्षांवर जनतेचा सोडा, त्यांच्या लोकांचाच विश्वास देसेनासा झाला आहे. असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की  भाजपामधील मेगाभरतीची काळजी करण्याऐवजी तुम्ही करण्या ऐवजी स्वत:च्या पक्षातील मेगागळतीची चिंता करावी, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.