बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मे 2020 (15:27 IST)

हे तर भाजपाचे आंदोलन राजकीय नैराश्यातून आहे

राज्यभरात भाजपा कार्यकर्ते माझं अंगण रणांगण या आंदोलनात सहभागी झाले आहेत. दरम्यान, या आंदोलनावर सत्ताधारी पक्षांनी टीका केली आहे. “भाजपाचे आंदोलन राजकीय नैराश्यातून आहे,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
 
“भाजपाचे आंदोलन राजकीय नैराश्यातून आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार सर्व स्तरावर शिकस्त करत आहे. याबाबत केंद्र सरकार व राज्य सरकार एकत्र काम करत आहे. जीएसटीचे पैसे केंद्रानं दिले नाहीत. ते त्वरित देण्यात यावेत. पॅकेज जाहीर झालं ते ४० दिवसांनी. अजूनही गाईडलाईन नाहीत. याउलट आरोग्य व जीवनावश्यक सुविधांचा मेळ राज्य सरकारनं घातला. केंद्र सरकारनं स्थलांतरित मजुरांचा विचार २१ मार्चला केला असता वा १ मे रोजी काही धोरण व पावलं उचलली असती, तर मजुरांची दैना झाली नसती,” असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.