पंकजा मुंडेंचे हे दबावतंत्र नाही, कार्यकर्त्यांच्या आक्रोषाला पक्षद्रोह म्हणता येणार नाही, आशिष शेलार
भाजपने मुंडे भगिनींना केंद्रीय मंत्रिमंडळातही डावलल्यानंतर त्यांच्या समर्थकांचे राजीनामे सत्र सुरू आहेत. दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसोबत मुंबईत मंगळवारी बैठक आयोजित केली. या बैठकीत पंकजा मुंडे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात पंकजा मुंडे शक्तीप्रदर्शन करून भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत असेही सांगितले जात आहे. पण, पंकजा मुंडेंच्या बैठका हे दबावतंत्र असूच शकत नाही त्या तसे करणार नाहीत असा विश्वास भाजप आमदार आणि नेते आशीष शेलार यांनी व्यक्त केला.
भाजप नेते शेलार सध्या पश्चिम महाराष्ट्रात असून कोल्हापुरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पंकजा मुंडे आणि त्यांच्या नाराजीच्या बातम्यांवर आपले मत व्यक्त केले. पंकजा मुंडे कुठलेही दबावतंत्र वगैरे वापरत नाहीत. कधी-कधी कार्यकर्त्यांचा आक्रोष होतो. त्याला पक्षद्रोह म्हणता येणार नाही. स्वतः पंकजा मुंडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे यावर वेगळे काही बोलण्याची गरज नाही असेही शेलार यांनी स्पष्ट केले.
यांनी त्यांच्या नाराज समर्थकांची वरळी निवासस्थानी बैठक बोलावली आहे.या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच भाजप नेते आशिष शेलार यांनी मोठं विधान केलं आहे.पंकजा मुंडे यांचं कोणतंही दबाव तंत्र नाही. त्या असं काही करणार नाहीत,असं आशिष शेलार यांनी सांगितलं.