गणेश भक्तांसाठी टोल फ्री प्रवास
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना 10 ते 13 सप्टेंबर दरम्यान टोल माफी देण्यात आली आहे. कोल्हापूर मार्गे कोकणात देखील गणेश भक्तांना टोल फ्री प्रवास करता येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय जाहिर केला आहे.