गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (08:37 IST)

राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांना पुन्हा मुदतवाढ, कार्यरत पदांच्या 35 % होणार ‘ट्रान्सफर’

राज्य पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचार्‍यांना  पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या  31 ऑगस्ट 2021 पर्यंत होणार आहेत.दरम्यान, एकूण कार्यरत पदांच्या 35 टक्के एवढया मर्यादत या बदल्या होणार आहेत. 35 टक्क्यांपेक्षा जास्त बदल्या करावयाच्या झाल्यास त्यास मुख्यमंत्री  यांची मान्यता घेणे आवश्यक आहे.याबाबतचे आदेश गृह विभागाकडून काढण्यात आले आहेत.
 
राज्य पोलिस दलातील सर्वसाधारण बदल्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापुर्वी 14 ऑगस्टपर्यंतच बदल्या करण्यात याव्यात असा आदेश काढण्यात आला होता. आता 31 ऑगस्ट 2021 पर्यंत राज्यातील पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात याव्यात असा आदेश काढण्यात आला आहे. सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही दि. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत पूर्ण करण्यात यावी.तथापि, त्यापुढे पुढील विशेष कारणास्तव आवश्यकतेनुसार मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने 31 ऑगस्ट, 2021 नंतर ही बदल्या करता येतील.
 
सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे भरणेसाठी करावयाची बदली.
– कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवेतील रिक्त पदे भरणेसाठी करावयाची बदली.
– कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी नियंत्रणकरिता तसेच प्रशासकीय निकडीनुसार रिक्त पदे भरणेसाठी करावयाची बदली.
– शासकीय कर्मचार्‍यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाची साधार तक्रार प्राप्त झाल्यामुळे बदली करणे आवश्यक
असल्याची बदली करणार्‍या सक्षम प्राधिकार्‍याची खात्री पटल्यास करावयाची बदली.
– विनंतीवरून करावयाची बदली.
– सर्वसाधारण बदल्या तसेच विशेष कारणास्त बदल्या करताना महाराष्ट्र पोलिस अधिनियम, 1951 मधील सर्व संबंधित तरतुदींचे पालन करण्याची दक्षता घ्यावी.
कोविड – 19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावाचा वेळावेळी आढावा घेऊन याबाबत पुढील आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही करण्यात येईल..