रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (16:15 IST)

तृप्ती देसाई यांना पोलिसांनी नगरच्या सुपे टोलनाक्याजवळ अडविले

भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी नगरच्या सुपे टोलनाक्याजवळ अडवले. त्या शिर्डीला जात असताना पोलिसांनी कारवाई केली. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पुढे जाण्यापासून रोखले. ड्रेसकोडवरुन लावण्यात आलेला फलक हटवण्यावर तृप्ती देसाई ठाम आहेत. कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली असून तृप्ती देसाई मात्र शिर्डीला जाण्यावर ठाम आहेत. कितीही थांबवले तरी शिर्डीत जाणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 
 
यावेळी पोलिसांनी अडवल्यानंतर तृप्ती देसाई म्हणाल्या,  आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण पोलिसांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही शिर्डीला जाणारच आहोत. लावण्यात आलेला फलक लवकरात लवकर लवकर हटवला जावा, अन्यथा आम्ही आणखी तीव्र लढा उभारु, असा इशारा तृप्ती देसाई  दिला आहे.