छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळीबार
छत्रपती संभाजीनगर : दोन युवकांनी दुकानात शिरुन लुटण्याच्या उद्देशाने गोळीबार केला. पहिल्या गोळीचा नेम चुकल्यामुळे दुकानचालक बालंबाल बचावला. एक राऊंड फायर झाल्यानंतर पिस्तुलची स्प्रिंग तुटल्यामुळे दुसरी गोळी झाडता आली नाही. घटनास्थळीच स्प्रिंगसह तीन जिवंत काडतुसे पडली. त्यानंतर गोळी झाडणारे घटनास्थळावरून पसार झाले. रस्त्यावर त्यांची हालचाल सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
ही घटना सिडको एन-२ परिसरातील ठाकरेनगरमध्ये जयभवानी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे शुभम फायनान्स ॲण्ड मल्टिसर्व्हिसेस दुकानात शुक्रवारी रात्री 8.48 वाजता घडली.