आपल्याला १४० कोटी लोकांचं कल्याण करायचं आहे. किमान शालेय पातळीवरचं अर्थशास्त्र शिका हो
३.५ ट्रिलियन डॉलर जीडीपीचा टप्पा पार केल्यानंतर भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, विरोधी पक्षांनी याच मुद्द्यावर सत्ताधारी मोदी सरकारवर आणि भाजपावर टीकास्त्र डागलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे. किमान शालेय पातळीवरचं अर्थशास्त्र शिका हो,असं म्हणत आव्हाडांनी भाजपाला टोला लगावला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले होते, “इंग्लंडचा जीडीपी ३.२ ट्रिलियन आहे. भारताचा ३.५ ट्रिलियन झाला म्हणून नगारे पिटणाऱ्यांनो, त्यांना फक्त ६.८ कोटी लोकांचं कल्याण करायचं आहे. आपल्याला १४० कोटी लोकांचं कल्याण करायचं आहे. किमान शालेय पातळीवरचं अर्थशास्त्र शिका हो!”