सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 1 मे 2022 (10:53 IST)

आमदार गोपीचंद पडळकर यांना X दर्जाची सुरक्षा

gopichand padalkar
भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना X दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत.
 
विशेषतः शरद पवारांवर त्यांनी केलेल्या आक्रमक टीकेनंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हल्ले होत असल्याचा आरोप करण्यात येत होता. दरम्यान, या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांना X दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.