सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 जून 2023 (10:11 IST)

यवतमाळ: यवतमाळ मध्ये अघोरी प्रकार, पाच दिवसांच्या बाळाला दिले गरम चटके

baby legs
यवतमाळच्या घांटजी तालुक्यात पारा पीएचसी मध्ये पाच दिवसांच्या बाळाला आई वडिलांनी बिब्बा गरम करून पोटाला चटके दिले. या घटनेमुळे बाळाची प्रकृती बिघडली आहे. यवतमाळ मध्ये घांटजी तालुक्यातील पारा पीएचसी मध्ये 6 जून रोजी बाळाचा जन्म झाला. घरी आल्यावर बाळ सतत रडत होते. बाळाच्या आई वडिलांनी बाळाला डॉक्टरकडे न घेऊन जाता घरीच गावातील ज्येष्ठांचे म्हणणे ऐकून बाळाच्या पोटाला बिब्बा गरम करून चटके दिले. या अघोरी प्रकारामुळे बाळ गंभीर जखमी झाले आहे. 
 
यवतमाळ जिल्ह्यात नवजात बाळाच्या पोटात दुखत होते.आई वडिलांनी अंधश्रद्धेमुळे अघोरी प्रकार करत बाळाच्या पोटाला बिब्बा गरम करून चटके दिले. या प्रकारामुळे बाळाची प्रकृती गंभीर झाली आहे. डॉक्टर कडून  चिमुकलीला वाचविण्याचे प्रयत्न सुरु आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 
 
Edited by - Priya Dixit