सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 12 जानेवारी 2022 (17:17 IST)

राज्यात आणखी 3 दिवस कोसळणार पाऊस, या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी

सध्या अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांचे पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील तीन चार दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरूच आहे. पण अद्याप तरी या पावसातून दिलासा मिळण्याचे संकेत काही दिसत नाही. पावसाच्या सरी अजून तीन दिवस कोसळणार आहे.पावसाचा मुक्काम अजून तीन दिवस वाढला असून  भारतीय हवामान खात्यानं(IMD) ने विदर्भाच्या काही जिल्ह्यात  यलो अलर्ट जारी करण्यासह राज्यात विदर्भ क्षेत्रात पुढील 2 दिवस विजांचा गडगडाटासह मुळसळधार पावसाचा सरी कोसळणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. 
आयएमडीच्या नागपूर येथील हवामान खात्यानं गुरुवार पर्यंत विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. आयएमडी ने इशारा दिला आहे की नागपूर, वर्धा भंडारा येथील काही भागात वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस सुरु राहील. तसेच चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट सुरु राहील. सध्या हरियाणा  आणि उत्तर मध्यप्रदेशातील चक्रीवादळ वाऱ्यामुळे विदर्भात पाऊस कोसळत आहे.

राज्यात आणखी 3 दिवस कोसळणार पाऊस, या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी या शिवाय नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातही दिवसभर गारपीट होण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.