शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 मार्च 2022 (10:04 IST)

15 जिल्ह्यांना यलो अर्लट

वाऱ्याच्या संगमामुळे व Trough in Easterlies केरळ किनारा  ते कोकण किनार्‍यापर्यंत; 
8-10 मार्च: महाराष्ट्र,गुजरात,पू.राजस्थान,पश्चिम मध्य प्रदेशात गडगडाटासह/जोरदार वाऱ्यासह,हलका/मध्यम पाऊस शक्यता.
8-9 मार्च:उत्तर मध्य महाराष्ट्रात व 9 मार्च:लगतच्या मराठवाड्यात गारपीट शक्यता.
-IMD
 
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आता पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. केरळ किनारपट्टी ते कोकण किनाऱ्यापर्यंत 10 मार्चपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्यप्रदेशात गडगडाटासह जोरदार वारा आणि हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
15 जिल्ह्यांना यल्लो अलर्ट
हवामान खात्याने राज्यातील एकूण 15 जिल्ह्यांना यल्लो अलर्ट जाहीर केला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे.
 
नाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्यास सुरु आहे मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 
 
9 मार्च रोजी कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह, सोसाट्याचा वारा आणि गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा आणि विदर्भ येथे देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
 
10 मार्च रोजी देखील कोकण, मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भ येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. तर पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज 9 आणि 10 मार्च रोजी आकाश अंशत: ढगाळ राहून नंतर सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता.