रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: शनिवार, 21 डिसेंबर 2024 (14:10 IST)

Russia Ukraine War: रशियावर 9/11 सारखा प्राणघातक हल्ला

Russia Ukraine war
रशियातील कझान शहरावर 9/11 सारख्या प्राणघातक हल्ल्याने खळबळ उडवून दिली. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनियन ड्रोनने कझानमधील निवासी इमारतींवर हल्ला केला आहे. त्यामुळे इमारतींचे पत्रे उडाले आणि मोठी आग लागली.मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
 
स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक स्फोटकांनी भरलेल्या UAV ने काझानमधील उंच इमारतींना लक्ष्य केले. यानंतर त्या इमारतींना भीषण आग लागली. ही घटना शनिवारी सकाळी घडली.
या घटनेत आतापर्यंत कोणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. परंतु स्थानिक अधिकाऱ्यांनी आपत्कालीन सेवा घटनास्थळी पाठवण्यात आल्याचे सांगितले.बाधित इमारतींमधून रहिवाशांना बाहेर काढले जात आहे. युक्रेनने ज्या रशियन शहरावर ड्रोनने हल्ला केला आहे ते कझान शहर कीवपासून 1400 किलोमीटर अंतरावर आहे.
Edited By - Priya Dixit