शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शिवजयंती
Written By

जेव्हा शिवाजींनी स्त्रीवर हक्क नव्हे सन्मान दर्शवला

जेव्हा शिवाजींनी 1659 इ. शेवटी कल्याण किल्ल्यावर विजय प्राप्त केली. परंपरेनुसार विजेत्यांचे तेथील स्त्रियांवरही हक्क होते. गोहर बाबू सुंदरतेचे प्रतिमा होती. त्यांच्या सेनापती आवाजी सोनदेव यांनी कल्याण पराभूत मुस्लिम सुबेदाराची अत्यंत सुंदर पुत्रवधू गोहर बाबू हिला बंदी घालून शिवाजींच्या सेवेत प्रस्तुत केले.
 
तेव्हा शिवाजींनी आधीतर स्वत: आणि सुबेदार सोनदेव यांच्याकडून गोहर बाबू यांची क्षमा मागितली. परंतू त्यांचे सौंदर्य बघून ते स्तुती केल्याशिवाय राहू शकले नाही. त्यांनी म्हटले की जर माझी आई आपल्यासारखी सुंदर असते तर मीही इतकाच सुंदर असतो.
 
आणि त्यांनी तिला मुक्त करून सन्मानपूर्वक तिच्या कुटुंबाकडे पाठवले आणि स्पष्ट केले की ते दुसर्‍यांच्या मुली-सुनांना आपल्या आईजागी बघतात. स्त्रियांप्रती त्यांच्या मनात असीम सन्मान होता. या घटनेमुळे केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम लोकंही शिवाजींच्या चरित्राचे मुरीद झाले.