रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जुलै 2023 (13:08 IST)

Belpatra Rules महादेवांना बेलपत्र इतकं प्रिय का आहे ? बेलपत्र अर्पित करण्याची योग्य पद्धत

bilva patra rules
Rules for Offering Bael Patra स्कंद पुराणाच्या कथेनुसार एकदा माता पार्वतीच्या घामाचा एक थेंब मंदाचल पर्वतावर पडला. त्यामुळे तेथे एक वनस्पती वाढली जी पुढे बेलपत्राच्या झाडात रूपांतरित झाली. अशी मान्यता आहे की ह्या वृक्षाच्या प्रत्येक भागात देवीचा वास आहे, त्यामुळे महादेवांना हे अती प्रिय आहे आणि महादेवांची पूजा करताना बेलपत्र वापरलं जातं.  बेलपत्राला हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं कारण की बेलपत्राच्या झाडाखाली दीवा लावण्याने बुद्धी कौशल्य वाढते, झाडाचे पूजन केल्याने महादेव प्रसन्न होतात. तसेच बेलपत्राच्या झाडाच्या मुळात आंघोळ करणे म्हणजे ब्रह्मांडातील सर्व पवित्र पाण्यात आंघोळ करण्यासमान आहे.

बेलपत्रात तीन पान असावे. पत्र खंडित नसावे. प्रथम बेलपत्र स्वच्छ पाण्याने चांगले धुवावे. एकतर आपण त्यावर टिळक लावू शकतो तसेच आपल्या श्रद्धेनुसार पानावर 'ओम' किंवा 'ओम नमः शिवाय' हे ही लिहू शकतो. नंतर बेलपत्राचा गुळगुळीत पृष्ठभाग शिवलिंगाला स्पर्श करून अर्पण करावा. या दरम्यान ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. 

धार्मिकदृष्ट्या बघितले तर असा विश्वास आहे की बेलपत्राचे तीन पान महादेवांचे त्रिनेत्र किंवा त्रिशूल असल्याचे प्रतीक आहे. काही जागी ह्यांना ब्रह्मा, विष्णू, महेश असे ही म्हटलं आहे. बेलपत्राचे तीन पान म्हणजे  मनुष्य स्वभावाचे तीन मूळ गुण अर्थातच तम, रजस आणि सत्व. तिन्ही गुण आपल्या विचार, भावना, कृती आणि जीवनावरील प्रतिक्रियांवर प्रभाव टाकतात. अशात बेलपत्र अर्पण करणे म्हणजे हे सोडून भौतिक वस्तूंचा वर जाऊन महादेवाच्या भक्तीमध्ये स्वतःला समर्पित करणे.
 
बेलपत्रात शोषून घेणाच्या गुणधर्म आहे त्यामुळे हे शिवलिंगाहून येणार्‍या तीक्ष्ण ऊर्जेचा ताप ही कमी करते. आणि वातावरणातील रज-तम कणांना पण अक्षम करण्यात मदत करतं. बेलपत्राचा हा गुण आपल्यातून नकरात्मकता आणि अशुद्ध तत्त्व शोषेल हा देखील विश्वास ठेवला पाहिजे.