बुधवार, 8 फेब्रुवारी 2023
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रावण
Written By
Last Modified सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (16:35 IST)

पिठोरी अमावस्या 2020: शुभ मुहूर्त, महत्व आणि उपाय

श्रावण अमावस्येचं विशेष महत्त्व आहे. या दिवशी पितरांना प्रसन्न केल्याने जीवनात सुख-समृद्धी आणि शांती मिळते असे म्हणतात. तसं तर प्रत्येक अमावस्येला पितरांना तरपण देण्याचे कार्य केलं जातं परंतू पिठोरी अमावस्याचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जातात. अनेक ठिकाणी आई आपल्या मुलांच्या दिर्घायुष्यासाठी व्रत करते.
 
पिठोरी अमावस्येला गंगा स्नान, पूजा-पाठ, दा‍न आणि पितरांना तरपण देऊन श्राद्ध केलं जातं. या दिवशी सकाळी लवकर उठून गंगा स्नान शक्य नसल्यास पाण्यात गंगा जल टाकून अंघोळ करावी. नंतर पुरुषांनी पांढरे वस्त्र धारण करुन पितरांना तरपण द्यावे. आपल्या पूर्वजांच्या नावावर तांदूळ, डाळ, भाज्या आणि शिजवलेलं अन्न तसेच काही धन दान करावे. यादिवशी महादेवाची पूजा करण्याचे देखील महत्त्व आहे.
 
अमावस्या आरंभ- 18 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10:39 मिनिटापासून
अमावस्या समाप्त- 19 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 08:11 मिनिटापर्यंत
 
याव्यतिरिक्त या दिवशी बायका आपल्या मुलांच्या दिघार्यु, आरोग्य आणि संतान प्राप्तीसाठी देवी आईची आराधना करतात. पूजेसाठी 64 देवींचे पिंड किंवा मुरत्या तयार करतात. नवीन वस्त्र धारण करुन पूजा करतात. पूजा स्थळ फुलांनी सजवतात.
 
पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी पार्वतीने इंद्र देवाच्या पत्नीला अमावस्या कथेचं वर्णन केलं होतं. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्याने हुशार आणि बलवान तसेच निरोगी संतान प्राप्ती होते.