गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. शीख
  3. शिखांचे सण
Written By
Last Modified: शनिवार, 13 जानेवारी 2018 (15:26 IST)

लोहडी

मकरसंक्रांत पंजाबामध्ये लोहडी म्हणून साजरी केली जाते. शीखांच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा उत्सव आहे. मकरसंक्रांतीच्या एक दिवस अगोदर लोहडी साजरी केली जाते. घरात नुकतीच सून आली असल्यास किंवा पहिला मुलगा झाला असल्यास या लोहडीचे महत्त्व काही वेगळेच असते. 

मुलांसाठी लोहडी आनंदाचा सण असतो. दिवसभर मुले या लोहडीच्या तयारीत व्यस्त असतात. रात्री एका ठिकाणी होळी पेटवली जाते. तेथे सगळे कुटुंब जमा होते. मग या अग्नीची पूजा केली जाते. त्याभोवती प्रदक्षिणा घातली जाते. त्यानंतर प्रसाद वाटला जातो. प्रसादामध्ये तीळ, गजक, गुळ, शेंगदाणे व मक्याच्या लाह्या यांचा समावेश असतो. 

अग्नी प्रज्ज्वलित केल्यानंतर त्याच्या सभोवताली तांदूळ, रेवडी आणि साखरफुटाणे यांची उधळण केली जाते. उपस्थित लोक ते उचलतात. या अग्नीतून मक्याच्या लाह्या वा शेंगदाणे जो कोणी उचलतो त्याची इच्छा पूर्ण होते, अशी समजूत आहे. 

यानंतर नाच-गाण्याचा कार्यक्रम होतो. महिला एकत्र येऊन पारंपरिक गाणी म्हणतात. नाचतात. रात्रीच्या भोजनात मक्याची रोटी, सरसों का साग असते. 

संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हा सण अतिशय आनंद साजरा करते.