गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. चव दक्षिणेची
Written By वेबदुनिया|

रवा टोस्ट

साहित्य : 4 चमचे रवा, 1/2 ताजे दही, मीठ चवीनुसार, 1 हिरवी मिरची बारीक कापलेली, ब्रेड स्लाइस आवश्यकतेनुसार, 1 मोठे टोमॅटो, 1 मोठी सिमला मिरची, तेल.

कृती : एका भांड्यात दह्याला फेटून त्यात रवा मिसळून घ्यावा. नंतर त्यात मीठ व हिरवी मिरची घालून मिश्रण एकजीव करावे. तवा गरम करत ठेवावा, टोमॅटो व सिमला मिरचीचे मोठे मोठे काप करून घ्यावे. गरम तव्यावर थोडंसं तेल घालून त्यावर ब्रेड स्लाइस ठेवून चांगल्या प्रकारे भाजून घ्यावी व दुसरी ब्रेडवर मिश्रण पसरवून त्यावर टोमॅटो व मिरचीचे काप ठेवावे. आता ब्रेडला दोन्हीजूने ने परतून घ्यावे. तयार आहे रंगबेरंगी क्रिस्पी रवा टोस्ट. या टोस्टला तुम्ही चटणी सोबत सर्व्ह करू शकता.