1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By भाषा|
Last Modified: ढाका , शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2010 (15:05 IST)

गोल्फमध्ये भारताला रौप्य पदक

दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्फमध्ये भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. राशिद खान, चिकारंगप्पा, राहुल बजाज आणि अशबीर सिंह सैनी यांच्या संघाने रौप्य पदक पटकविले.

स्पर्धेत भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यांनी तीन ओवरमध्ये 435 स्कोर करुन रौप्य पदक पटकविले. बांगलादेशच्या जमाल हुसैन मुल्लाह, दुलाल हुसैन, मोहम्मद शखावत सोहेल आणि मोहम्मद जाकिरूज्जमान यांनी 10 अंडर 422 स्कोर करुन सुवर्णपदक घेतले. श्रीलंकेने 15 ओवर 447 स्कोर करीत कांस्य पदक मिळविले.