मैरीकॉम ऑलिम्पिक पदकापासून एक पाऊल दूर
६ ऑगस्टला होईल क्वार्टर फायनल लढत
लंडन ऑलिम्पिकमध्ये मुष्टियुद्धात भारताची पदकाची आशा असलेली एमसी मैरीकॉमने रविवारी क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश केला. येत्या ६ ऑगस्टला तिची ही लढत होणार आहे.मैरीकॉम ने ५१ किलो वर्गात पोलंडच्या कॅरोलिनाचा १९-२४ ने पराभव करत आगेकूच केली. २ मुलांची आई असलेली मैरीकॉमने ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम घेतले होते. तिच्याकडून पदकाची आशा व्यक्त करण्यात येत आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. महिला मुष्टियुद्धात मैरीकॉमच्या ठोस्यांना भारतच नाही तर संपूर्ण जगभरातून मान्यता मिळाली आहे. पांच वेळा विश्वविजेतेपद ठरलेल्या मैरीकौमचे नांव मँगते चंग्नेइजँग आहे.तिचा जन्म १ मार्च १९८३ रोजी मणिपुर मध्ये झाला. वडिल शेतकरी होते. घरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. बालपण संघषर्शत गेले. मणिपुरचे बॉक्सर डिंगो सिंह यांच्या यशाने तिला बॉक्सिंग कडे आकर्षित केले. तिने २००१ मध्ये पहिल्यांदा नॅशनल वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकली. २००३ मध्ये भारत सरकारने तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. २००६ मध्ये तिला पद्मश्री आणि २००९ मध्ये राजीव गांधी खेलरत्म पुरस्कार प्राप्त झाला आहे. (वेबदुनिया न्यूज)