शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नाशिक , सोमवार, 11 डिसेंबर 2023 (08:06 IST)

नाशिकची सुषमा चौधरी ठरली देशातील सर्वोत्तमअष्टपैलू खेळाडू

kho kho game
दिनांक ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर दरम्यान नाशिक येथे ६७व्या १७ वर्षा आतील शालेय राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील मुलींच्या विजेत्या महाराष्ट्र राज्याचे कर्णधार पद नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या शासकीय माध्यमिक कन्या शाळेची आणि संस्कृती नाशिकची खेळाडू सुषमा चौधरी  हिच्याकडे होते.
 
याच शाळेतील तिची दुसरी सहकारी खेळाडू रोहिणी भवर हिच्या साथीने  महाराष्ट्राने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. सुषमा चौधरी  महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषविणारी नाशिकची पहिली खेळाडू आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील सुषमाच्या अष्टपैलू कामगिरीमुळे देशातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून तिची निवड करण्यात आली आहे.
 
या आधी भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या १८ वर्षा आतील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील सर्वोत्तम आक्रमक म्हणून वृषाली भोये हिला पुरस्कार मिळाला होता.राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळविणारी सुषमा ही नाशिकची दूसरी खेळाडू आहे. १
 
७ वर्षा आतील गटात राज्याच्या संघात निवड होणाऱ्या  सुषमा आणि रोहिणी या नाशिकच्या पहिल्या खेळाडू आहेत .सुषमाची दुसरी तर रोहिणीची सलग दुसरी राष्ट्रीय स्पर्धा असून नाशिक जिल्हा खो खो असोसिएशन संचलित स्व. सौ सुरेखा ताई भोसले निवासी खो खो प्रबोधिनी आणि संस्कृती नाशिकच्या खेळाडू आहेत.