सेरेनाला पराभवाचा धक्का
अमेरिकेच्या सेरेना विलियम्सला येथे खेळल जात असलेल्या इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला.
तिसर्ये फेरीत सेरेना व व्हिनस या भगिनी समोरासमोर आल्या होत्या. व्हिनसने सेरेनाला 6-3, 6-4 असे नमविले. 29 व्या वेळी या दोघी समोरामोर आल्या होत्या. व्हिनसने दुसरा मॅचपॉईंट घेत फोरहॅण्डने हा सामना जिंकला. दहाव्या स्थानावरील व्हिनस ही अंतिम 16 जणाच्या फेरीत दाखल झाली आहे. तिला 12 व्या स्थानावरील जॉर्जेस अथवा अनस्टॅशिया सेवास्तोव्हा यांच्यातल विजेत्याशी खेळावे लागेल.