रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : रविवार, 31 डिसेंबर 2017 (18:27 IST)

युकी ला "कढे" आव्हान

भारतातील सर्वात मोठी टेनिस स्पर्धा टाटा ओपन महाराष्ट्र, 1 जानेवारी 2018 पासून पुणे येथील श्री शिवछत्री बालेवाडी स्टेडियमवर सुरू होणार आहे. पुरुषांच्या एकेरीचे सामने आज बालेवाडी स्टेडियमवर जाहीर करण्यात आले. भारताचा नंबर एकचा खेळाडू युकी भांबरी स्थानिक पसंतीतील अर्जुन कढे यांच्या विरोधात खेळणार आहे. कढे ज्याची विश्व रँकिंग 608 आहे, वाइल्डकार्ड द्वारा प्रवेश देण्यात आला आहे. दुसरा भारतीय वाइल्ड कार्ड प्रवेशक रामकुमार रामनाथन ला पहिल्या फेरीत मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. पहिल्या फेरीत त्याची गाठ स्पेनचा रॉबेर्तो कॅराबेलेस सोबत पडणार आहे. जागतिक क्रमवारीत 33 व्या स्थानावर असलेल्या नेदरलॅंड्सच्या रॉबिन हस्सी याची लढत स्लोव्हाकियन ब्लाझ कवचिक विरुद्ध असणार आहे. फ्रेंच खेळाडू गॅलेस सायमनला अमेरिकेच्या तेँनीस सँडग्रीन चा आव्हानला समोर जावे लागेल. पहिल्या चार मनाचे खेळाडू मॅरिन सिलीक, केव्हिन अँडरसन, बतिउस्टा अगाट आणि बेनोइट प्रेरी यांना पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे.

पुण्याहून अभिजीत देशमुख