रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्लमबाजी
Written By वेबदुनिया|

यापेक्षा चांगला चित्रपट पदार्पणातच मिळाला नसता- सोनम

PRPR
अभिनेता अनिल कपूर याची मुलगी सोनम कपूर हिने अभिनयाच्या दुनियेत कधीही पाय ठेवण्याचा विचार केला नव्हता. 'ब्लॅक' या चित्रपटासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळीची सहायक दिग्दर्शक म्हणून तिने काम केले. एक दिवस अचानक संजयने तिला 'सांवरीया' ची नायिका बनविले. यानिमित्ताने तिच्याशी मारलेल्या गप्पांचा सारांश.

अभिनय कारकिर्दीची यापेक्षाही चांगली सुरवात होऊ शकली असती का?
नाही! चित्रपटात अभिनय कारकिर्दीसाठी हीच सर्वांत चांगली सुरवात ठऱू शकेल. संजय लीला भन्साळींसारख्या प्रख्यात दिग्दर्शकाबरोबर काम करणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. मला माझ्या ‍पहिल्याच चित्रपटात त्यांच्यासारख्या महान दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाली. यापेक्षा अधिक मोठी गोष्ट काय असू शकते. या चित्रपटात माझी भूमिका चांगली आहे.

संजय लीला भन्साळींविषयी काही वाटते?
मी त्यांना माझे गुरू म्हणून मानते. मी जेव्हा त्यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले, तेव्हा मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. अभिनयाचे शिक्षणही त्यांनीच मला दिले. मला जेव्हा एखाद्या सल्ल्याची गरज पडते तेव्हा मी पहिल्यांदा त्यांनाच विचारते. ते प्रत्येक काम मनापासून करतात. 'सांवरीया' त्यांनी अगदी मनापासून बनविला आहे.

चित्रीकरणावेळी तुझ्यावर ते रागावले होते, हे खरे आहे का?
होय! ते खरे आहे. आपण शाळेत योग्य गृहपाठ केला नाही तर शिक्षकही आपल्यावर रागावतो. याप्रमाणे चित्रीकरणावेळी कधी चुकीचे काम झाले तर सर्वांबरोबर मलाही त्यांचा राग सहन करावा लागत होता.

प्रेक्षकांना तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत!
अनिल कपूर यांच्या सारख्या ज्येष्ठ अभिनेत्याची मुलगी असल्यामुळे लोकांना साहजिकच माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. मी माझ्या वडीलांशी तुलना करण्याचा विचारही करू शकत नाही. 'सांवरीया' सुपर हीट होण्यासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करत आहे.

सलमान खान आणि राणी मुखर्जी यांच्याबरोबर अभिनय करताना कसे वाटले?
मला सलमान आणि राणी मुखर्जीं दोघेही खूप आवडतात आणि त्यांच्याबरोबर मला पहिल्याच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. राणी एक महान अभिनेत्री आहे. सलमान मला लहानपणापासून आवडतो. तो एवढा सुंदर आहे की प्रत्येक मुलीला तो आवडतो. माझ्या वडीलांची आणि त्याची चांगली मैत्री आहे. सेटवर सलमानने नेहमी माझी काळजी घेतली.

रणबीरची कोणती सवय तुला आवडत नाही?
त्याला कोणतीही वाईट सवय नाही.

तू दिग्दर्शन आणि अभिनय असे दोन्ही क्षेत्रात काम केले आहेत. यापैकी कोणते काम सोपे वाटले?
दोन्हीही कामे आव्हानात्मक आहेत.

भविष्‍यात तुला चित्रपट दिग्दर्शक होणे आवडेल का?
सध्या चार-पाच वर्ष मी अभिनयाकडे लक्ष केंद्रित करणार आहे. त्यानंतर दिग्दर्शनाचे काम करण्याचा विचार करेन.

तू कविता लिहिते आणि पेंटींगही करते असे ऐकले आहे.
मी खूपच भावनिक आहे. कविता किंवा चित्र हे दोन्ही सृजनशीलतेची माध्यमे आहेत. माझ्या भावना या दोन माध्यमातून सशक्तपणे व्यक्त होतात, असे मला वाटते.