रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्लमबाजी
Written By वेबदुनिया|
Last Modified: शुक्रवार, 18 जानेवारी 2008 (15:56 IST)

हातात नाही चित्रपट आणि चोखंदळपणाचा आव

IFMIFM
'गॅगस्टर', वो लम्हे',आणि 'लाइफ इन ए मेट्रो' या चित्रपटात कंगनाने छान अभिनय केला होता. यातील दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. पण कंगनाला मात्र फारसा फायदा झाला नाही. तिच्याजवळ सध्या केवळ दोन चित्रपट आहेत. यात मधुर भंडारकरचा फॅशन आणि समीर कर्णिकचा 'रोशन' यांचा समावेश आहे.

कंगना चांगली अभिनेत्री आहे. अंगप्रदर्शनालाही ती लाजत नाही. असे असूनही निर्माते तिला चित्रपटात घेण्यास उत्सूक नाहीत. पण कंगना म्हणते, मी मला कथा आवडली तरच चित्रपटात काम करते. अन्यथा नाही. म्हणूनच माझे चित्रपट कमी आहेत. मधुर भांडारकरच्या 'फॅशन' बद्दल तिला खूप आशा आहेत.

कंगनाचे वर्तन आणि लाइफ स्टाईल तिच्या यशात अडथळा ठरत आहेत, असे बोलले जाते. तिच्या बिनधास्त वागण्याची चर्चा बॉलीवूडमध्ये कायम सुरू असते. आदित्य पंचोलीसोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा देखिल रंगल्या आहेत. चित्रपट निर्माते शिस्तप्रिय अभिनेत्रींनाच प्राधान्य देतात. तिथेच कंगनाचा पत्ता कट होतो.

कंगना प्रत्येक गोष्ट मन लावून शिकत आहे. कमी चित्रपट करीत असल्यामुळे इतर वेळेत ती शास्त्रीय नृत्य, संगीत, योग आणि पियानो वाजविणे शिकत आहे. या सर्व गोष्टींनी अभिनय सुधारतो, असे तिचे म्हणणे आहे.

वीस वर्षाची कंगना स्वत:तच रमणे पसंत करते. ती स्वत:चीच चांगली मैत्रीण असून तिला कोणा पुरूष मित्रांची गरज वाटत नाही. पार्टी किंवा समारंभात एकटेच जाणे तिला आवडते.

काही खास ठिकाणी बॉयफ्रेंड हवा असे तिला वाटते. पण रोजच्या जीवनात त्याची गरज आहे, असे तिला वाटत नाही. आपण अजूनही लहान आहोत, असे तिला वाटते.