गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. व्हॅलेंटाईन डे
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (18:30 IST)

लग्नानंतर पहिला व्हॅलेंटाइन डे अशा प्रकारे साजरा करा नातं अधिक होईल घट्ट

लग्नानंतर व्हॅलेंटाइन डे बद्दल नवरा-बायकोमध्ये एक वेगळा उत्साह असतो. कारण हा क्षण प्रथमच असतो जेव्हा ते दोघे एकत्र एकाच घरात या क्षणाला या आठवड्याला एकत्ररीत्या साजरा करणार. प्रत्येकाची इच्छा असते की त्याच्या लग्नानंतरचे हे प्रथम व्हॅलेंटाइन डे कायमस्वरूपी लक्षात राहावं.पण प्रश्न असा येतो की ह्याला खास आणि संस्मरणीय कसे करावे. चला तर जाणून घेऊ या.
 
* उशाशी काही भेटवस्तू ठेवा-
लग्नानंतरच्या या प्रथम व्हॅलेंटाइन डे ला साजरा करत आहात तर आपल्या जोडीदाराला खास अनुभवायचे असल्यास सकाळी त्याला काही सरप्राइज देऊन दिवसाची चांगली सुरुवात करू शकता. या साठी आपण आपल्या जोडीदाराच्या उशाशी काही ठेवा म्हणजे सकाळी तो उठल्यावर सरप्राइज बघून आनंदी होईल.
 
* कोणासह गुलाबाचे फुल पाठवा-
जर आपले जोडीदार ऑफिसमध्ये आहे किंवा घरात काम करत आहे आणि दिवसाचा वेळ कंटाळवाणी असतो. या वेळेला चांगले आणि खास बनविण्यासाठी एखादाच्या हाती गुलाबाचे फुल आणि त्यामध्ये गोड संदेश पाठवू शकता. ज्याला बघून आपला जोडीदार आनंदी होईल आणि त्वरितच फोन करून आपले प्रेम दर्शवतील.
 
* सोशल मीडियावर अभिव्यक्ती -
जर आपला जोडीदार सोशल मीडिया फ्रेंडली आहे तर आपण आपल्या प्रोफाइलवर थोडे बदल करून त्यांना आनंद देऊ शकता.आपण एकादिवसासाठी आपल्या प्रोफाइलवर किंवा इंस्टायुजर वर आपले नाव जोडीदारासह जोडून ठेवा. किंवा व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबुकवर जोडीदारासह डीपी लावा किंवा जोडीदाराची डीपी लावा. किंवा चांगले स्टेट्स लावून त्यांना खास अनुभव देऊ शकता. 
 
* कँडल लाइट डिनर-
कोरोनामुळे कुठे बाहेर जायचे नसल्यास घरातच कँडल लाइट डिनर आयोजित करा. या साठी आपण दोघे तयार व्हा. बाजार पेठेतून सुवासिक मेणबत्ती आणा आणि एकमेकांच्या आवडी -निवडीची काळजी घेता बाहेरून जेवण मागवा किंवा घरातच कुटुंबीयांच्या मदतीने जेवण तयार करून ठेवा आणि कँडल लाइट डिनर करून त्या क्षणाला अनुभवा आणि एकमेकांवर आपले प्रेम व्यक्त करा.