सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. विधानसभा निवडणूक 2014
Written By wd|
Last Modified: सातारा , गुरूवार, 25 सप्टेंबर 2014 (10:28 IST)

...तर राष्ट्रवादीशी आघाडी होणे अवघड: मुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसने काही अशक्य अटी- शर्ती घालून बोलणी सुरू ठेवल्यास मात्र आघाडी होणे अवघड आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संकेत दिले.  काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मुंबई, नागपूरसह राज्यात सहा सभा होणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

दोन दिवसांवर अर्ज भरण्याची अंतिम तारीख आली आहे. तरीदेखील महायुतीप्रमाणेच सत्ताधारी आघाडीतील जागावाटपाचे घोडेही अडलेलेच आहे. गेल्या दोन दिवसांत कॉंग्रेस- राष्ट्रवादी नेत्यांत चर्चेच्या दोन फेर्‍या होऊनही त्यातून ठोस तोडगा निघाला नाही. या पार्श्वभूमीवर मुंबईतील चर्चेचा ‘फड’ सोडून मुख्यमंत्री कराड मतदार संघात प्रचारासाठी दाखल झाले आहेत.