रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. विठ्ठल
Written By वेबदुनिया|

भाविकांसाठी आज अभंगरंग

WD
खास आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील राजा परांजपे प्रॉडक्शनच्यावतीने अभंगरंग संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संत तनपुरे महाराज मठ येथे एकादशीस हा कार्यक्रम भाविकांसाठी मोफत आयोजीत करण्यात आला आहे. यामध्ये भक्तिगीते, अभंग यांची मेजवानी असणार आहे. सारेगम या कार्यक्रमातील कलाकार आपली कला सादर करतील. प्रसिध्द गायक चैतन्य कुलकर्णी, हृषीकेश गुजर, कल्याणी पांडे, संजीव मेहंदळे, प्रसाद जोशी, दीप्ती कुलकर्णी, राजेंद्र भालेराव, रमाकांत परांजपे आदी कलाकार सहभागी होणार आहेत.